Maharashtra

हे सरकार आहे की जाहिरातकार ?

पुराणे थैमान घातलेल्या भागात सरकार तर्फे गहू तांदूळ वाटप करत आहे. पण केलेल्या कामाची जाहिरात बाजी ही करत आहे. त्यावर मुख्यमंत्री महोदयांचा फोटो चिकटून काय साध्य करणार. आहात. सरकार आहात की तुम्ही जाहिरातकार आहात एवढे कसे प्रसिद्धीच्या आहारी गेलात. असे जनता प्रश विचारीत असून सरकारने हे चिकटवलेले फोटो म्हणजे खूप घाणेरडं कृत्य तर आहेच पण संवेदनशील मनाला हे कदापि पटणार नाही. अरे काय परिस्थिती आहे आणि तुम्हला काय सुचत काल महाजनांच्या सेल्फी आणि आता हे मुख्य मंत्री दर्शन खर तर तुम्ही मदत करताना ही जाहिरात बाजी करत आहात हे न पटण्या सारख असून जनतेच्या आणि पूरग्रस्त जणांच्या मनातून तुम्ही उतरत चालला आहात काय गरज आहे तो खर्च करण्याची तो होणारा खर्च पूरग्रस्त निधीत दिला असता तर काय बिघडले असते का ? फक्त जाहिरात बाजी ची एक ही संधी न सोडणारे हे संधी साधू सरकार असून त्यांना कुठे जाहिरात करावी याची ही अक्कल नसावी याच दुःख वाटत असून खरोखर सरकारची कीव येते !

About the author

मुख्य संपादक : आदिनाथ दशरथे

Add Comment

Click here to post a comment

Advertisements

Featured

Advertisement1

Banner

Advertisement2

Banner