मुंबई | पवारसाहेबांना ED ची नोटीस मिळाली आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अत्यंत वेगानं बदललं आणि वरीष्ठ नेते सोडून गेल्याने गर्भगळीत झालेलेकार्यकर्ते जोमानं कामाला लागले.
काँग्रेसला मात्र अजूनही म्हणावी अशी उभारी घेता आलेली नाही. बाळासाहेब थोरात प्रयत्न करत असले तरी ते अपुरेचं पडत आहेत. त्याचवेळी शांत बसले असे वाटणारे राज ठाकरे आश्चर्यकारक अशी नवीन मागणी घेऊन समोर आले ती मागणी होती विरोधीपक्ष म्हणून काम करू द्या आणि लोकांच्या मनालाही ती मागणी पटली, इथे राजसाहेबांनी यॉर्कर वर सिक्सर मारला.
सर्वजण सत्तेत येण्याच्या गोष्टी करताना मनसे ची ही मागणी वेगळी आणि लोकांना भावणारी वाटली कारण गेल्या सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्ष उत्कृष्ट तर सोडा साधारण कामगिरी करण्यातही कमी पडला हे लोकांच्या लक्षात आहे. आणि हीच बाब राज ठाकरे यांनी बरोबर ओळखली आणि प्रचाराला मुद्दा करत मला सत्ता नको म्हणत.
विरोधात बसवा ही मागणी केली.
पुणे नवीमुंबई कल्याण ठाणे नाशिक येथे सेनेने मित्रपक्षासाठी सोडलेल्या जागांवर जिथे सेनेचा थेट उमेदवार नाही. तिथे सेनेचे नाराज कार्यकर्ते लगोलग राकॉं किंवा काँग्रेसला मतदान करतील असे सध्या तरी वाटत नाही आणि याचा फायदा मनसेला होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वंचितने लोकसभेत आघाडीचे केलेले नुकसान लक्षात घेता यावेळीही त्यांचा प्रभाव दिसून येईल यात शंका नाही. वंचीत चा इफेक्ट हा आघाडी ला होऊ शकतो. एकंदर परिस्थिती पाहता आज जरी एकांगी वाटत असलेल्या लढतीत पुढे जाऊन अनाकलनीय निकाल लागू शकतील.
जनभावना कधी बदलेल याचा काही भरवसा नसतो. जस लोकसभेला जनतेने पुन्हा राष्ट्रीय मुद्दे लक्ष्यात घेऊन भाजप ला स्पष्ट बहुमत दिल.अगदी तसच प्रादेशिक मुद्दे लक्ष्यात घेऊन मतदान जर झालं तर निकाल हे अनाकलनीय असतील यात तीळ मात्र शंका नाही.
Add Comment