संपादकीय | सत्ता धारी जनतेला जे हवं आहे.ते कुणीच देत नाही. आणि जे मागितलं नाही ते माथी मारण्याची उगाच करत आहेत घाई ‘अस म्हणावं लागेल.
कुणी मागतील तुमच्याकडे१०रुपात जेवण द्या, एक रुपयात तपासण्या करा वीज बिल माफ करा.जनता जे मागते ते तुम्ही दिल नसल्या मुळे उगाच पोकळ आश्वासन देऊन दिशाभूल कश्यासाठी करताय जे सत्तेत असून करता आलं नाही.
आता परत सत्ता द्या करून दाखवतो अस म्हणणं म्हणजे सरळ सरळ जनतेला वेड्यात काढल्या सारख होईल.जनता एवढी दूध खुळी आहे का?जनतेला काही समजत नाही का ? राजकारण करा पण अस करू नका.
जनता मागते खड्डे मुक्त रस्ते.जनता फुकट नको परंतु चांगल्या आरोग्य सुविधा द्या माफक पैसे भरायला तयार आहे. शेतकरी मागतोय त्याने पिकवलेल्या मालाला हमी भाव. त्याने उत्पादन केलेल्या मालाला जर योग्य बाजार भाव मिळाला.
तर तो सरकार कडे कर्ज माफी मागणार नाही. वीज बिल माफी मागणार नाही. जे जनता मागते त्यावर काहीच बोलायचं नाही. जे मागत नाही ते आम्ही देणार अश्या घोषणांचा पाऊस पडायचा
आणि दिश्या भूल करायचा.
दहा रुपयात पोट भर जेवण कुणी मागितलं तुमच्याकडे बर त्याचा दर्जा काय असेल.तुम्ही सांगाल का ? झुणका भाकर केंद्र उभारली होती त्याच काय ? झालं.
आरे ला कारे करण्याची हिंमत कुठे ?महानगरपालिका तुमची पर्यावरण मंत्री पद तुमच्याकडे सरकार तुमचं होत. केंद्रात ही सरकार तुमचं मग परत सत्ता द्या ही म्हणण्याची लाजिरवाणी बाब तुमच्यावर येते कशी जरा स्वपरिक्षण करा.
जनतेच्या हिताचं रक्षण करणार सरकार हवं सत्ता देऊन ही तुम्ही काही करू शकले नाही. आणि आता परत म्हणता सत्ता द्या आम्ही करून दाखवतो. अस बोलणं म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ लावल्या सारख असून, देत असाल तर जनता काय ? मागते ते द्या जे मागितलं नाही ते देणार हे कश्या साठी बोलत सुटलात. शेवटी जनता हुशार आहे. सगळं समजत आहे.
Add Comment