Front Maharashtra Politics

समोर पहिलवान नाही मग मोदी आणि शहा आखाडा खांदायला येतात का ? अमोल कोल्हे

अहमदनगर | अमोल कोल्हे ही राष्ट्रवादीची मुलुख मैदान तोफ झाली असून त्यांच्या सभा आणि त्यांची भाषण सम्पूर्ण महाराष्ट्रात सध्या निवडणूक प्रचारात गाजत आहेत.आज अहमदनगर शहरात राष्ट्रवादी चे उमेदवार संग्राम जगताप यांच्या साठी अमोल कोल्हे यांची तोफ धडाडली असून त्यांनी युती वर जोरदार हल्ला केला आहे.प्रचारातील भाषणा दरम्यान बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फणविस यांच्या आम्ही लढण्यास तयार आहोत!परंतु आखाड्यात पहिलवान नाही .म्हंटलेल्या वक्तव्याचा समाचार घेतत्यांनी म्हंटल!जर आखाड्यात पहिलवान नाही.तर मग मोदी साहेब अमित शहा आखाडा खांदायला इकडे येतात का? शाळेतून शिक्षक पालकांना का?बोलवतात तर ज्या वेळी कार्ट..नापास होत अथवा अभ्यास करत नाही त्यावेळी बोलावलं जात असे म्हणत जोरदार कोपखळी ही युतीला मारली.

तर सेनेवर टीका करताना त्यांनी प्रश्न ?उपस्थित केले.एक रुपयात झुणका भाकर काय झालं?आणि त्या शिववड्याच ही काय झालं?अस म्हणत त्यांनी शिवसेना व भाजप च्या थाळी ची चांगलीच खिल्ली ही उडवली.

तर अखेर थोडं भावुक होऊन त्यांनी जात, पात,धर्म,नंतर पहा जगण्यासाठी पोटाला भाकरी लागते.त्या भाकरीचा विचार करा अस म्हणत बेरोजगरीवर जाता जाता भावनिक होऊन टोला मारला.आणि अहमदनगर शहरातून पुन्हा एकदा संग्राम जगताप यांना निवडून आणा अस आव्हाहन ही उपस्थित असणाऱ्या जनतेला केलं.

About the author

laksh5

Add Comment

Click here to post a comment

Advertisements

Featured

Advertisement1

Banner

Advertisement2

Banner