हिंगोली जिल्हा पोलिस दलातील २७ पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत. यामध्ये १९ जणांना उपनिरीक्षकपदी तर २ जणांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तर दोघांना जमादार पदावर पदोन्नती मिळाली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट मानली जात आहे.हिंगोली जिल्हा पोलिस दलात मागील काही दिवसांपासून पदोन्नतीच्या हालचाली सुरु होत्या. पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे रिक्तपदानुसार पदोन्नतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सदर प्रस्ताव सादर होताच पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहे.
यामध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बळीराम भोईनर, शेषराव राठोड (गोरेगाव), प्रकाश चोपडे, राम वंजे, प्रल्हाद शेळके (वसमत ग्रामीण), सुभाष काळे, आश्रू डोईजड, मदन गव्हाणे (बासंबा), बबन गांजरे, अफसर अली पठाण (जिल्हा विशेष शाखा), बजरंग सातव, हनुमंत धतुरे, यशवंत गुरुपवार (मुख्यालय), रावसाहेब घुमनर (शहर वाहतुक शाखा), शेख खुद्दूस शेख लाल (औंढा नागनाथ), मधुकर नागरे (आखाडा बाळापूर), प्रकाश नेव्हल, सुभाष परसावळे (हट्टा), शेख इस्माईल (भरोसा सेल) यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.या सोबतच पोलिस नाईक नितीन गोरे (गुन्हे शाखा), संभाजी मोरे (शहर वाहतूक शाखा), पंडीत पिंपरकर, बालाजी मुंढे (मुख्यालय), सतीष कुटे (हिंगोली शहर), बालाजी जोगदंड (आखाडा बाळापूर) यांना पोलिस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे. तर जमादार दिगंबर घुमनर (हिंगोली ग्रामीण), रेश्मा बेगम (जिल्हा विशेष शाखा) यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपाधिक्षक सुरेश दळवे, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
Add Comment